२७ जानेवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लोकार्पण व ग्रंथोत्सवाचे आयोजन

0

२७ जानेवारी रोजी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या नुतन इमारतीचे लोकार्पण व ग्रंथोत्सवाचे आयोजन

         धाराशिव,दि.25 ):- जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय धाराशिवच्या नुतन इमारतीचे लोकार्पण आणि दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे संयुक्त उदघाटन 26 जानेवारी 2024 रोजी पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सकाळी 10.5 वाजता करण्यात येणार आहे.अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे हे असतील.प्रमुख अतिथी म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार सर्वश्री सतीश चव्हाण,विक्रम काळे,सुरेश धस,राणाजगजितसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले,कैलास घाडगे-पाटील,जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राहूल गुप्ता,पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे,जिल्हा कोषागार अधिकारी जी.बी. निगवेकर, जिल्हा नियेाजन अधिकारी अर्जुन झाडे,सहायक ग्रंथालय संचालक सुनील हुसे,शिक्षणाधिकारी सुधा साळुंके,धाराशिव मुख्याधिकारी वसुधा फड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के. चव्हाण,उपविभागीय अभियंता पी.डी. मोरे,सहायक अभियंता के.एस. गायकवाड,तहसिलदार शिवानंद बिडवे व जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व्ही.जी.सुर्यवंशी यांची उपस्थिती राहणार आहे.

        26 ते 27 जानेवारी दरम्यान आयोजित दोन दिवसीय ग्रंथोत्सव -2023 मध्ये 26 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 वाजापर्यंत वाचनालय कार्यकारी मंडळांच्या चेंज रिपोर्टर

 

 

 

(बदल प्रक्रीयेत) येणाऱ्या अडचणी या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे.यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक धर्मादाय आयुक्त श्रीमती आर.आर. कोदे  मार्गदर्शन करतील अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष व्ही.जी. सुर्यवंशी हे असतील सुत्रसंचालन लहुराज लोमटे हे करतील.

     दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजता दरम्यान कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये श्याम नवले,अविनाश मुंडे, विजय गायकवाड,समाधान शिकेतोडे,शंकर कसवे,शिवराज मेनकुदळे,युवराज चव्हाण,किरण देशमाने, प्रभाकर बनसोडे,सोनाली आरडले, विद्या देशमुख, सविता बिडवे, संगीता भांडवले, डॉ.रेखा ढगे, अपर्णा चौधरी, स्नेहलता झरकर, संगीता पोतदार व डि.के.शेख हे सहभागी होतील.अध्यक्षस्थानी कवी व साहित्यिक युवराज नळे हे असतील.सुत्रसंचालन प्रा.डॉ.अरविंद हंगरेकर हे करतील.

          27 जानेवारी रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता पर्यंत धाराशिव जिल्हयाचा इतिहास या विषयावर इतिहास संशोधक प्रा.डॉ.सतिश कदम यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.दुसरा व्याख्यानाचा विषय मराठी भाषेची वैभवशाली परंपरा हा  प्रा.डॉ.प्रशांत चौधरी हे व्याख्यान  देतील.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य रा.प.महाविद्यालयाचे डॉ.रमेश दापके राहतील.

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top