मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

0

 मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन


धाराशिव : 
मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती,धाराशिव यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे भव्य ध्वजारोहण होणार असून त्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती पदी राष्ट्रवादी पार्टीचे नेते संजय निंबाळकर  असणार आहेत तसेच सायंकाळी ७.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य किल्ला सजावट, भवानी माता पूजन व LED लेझर लाइटिंग डेकोरेशनचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी राज्य मंत्री तथा तुळजापूर धाराशिव चे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी यशवंत नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सतीश दंडनाईक असणार आहेत तर प्रमुख उपस्थिती जिल्हा केमिस्ट अँड रजिस्टर असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे असणार आहे तरी या भव्य दिव्य कार्यक्रमास धाराशिव जिल्ह्यातील व शहरातील शिवभक्तांनी हजर राहावे असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top