भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
धाराशिव दि.१७ (प्रतिनिधी) - भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव शहराजवळील स्वधार मतिमंद विद्यालयात खाऊचे वाटप करण्यात येणार आहे. तर लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील जिल्हा परिषद शाळेत चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा व बौद्धिक क्षमता स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या विविध स्पर्धेत ३० विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला. चित्रकला स्पर्धेत प्रथम श्रावणी शक्तिसागर शिंदे, द्वितीय प्राजक्ता जितेंद्र बनसोडे, तॄतीय मुस्कान काशीम इनामदार रांगोळी स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. तसेच वाशी तालुक्यातील पारगाव येथे रक्तदान शिबीर व ग्रामीण रुग्णालयात फळांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच तुळजापुर शहरात
महाद्वारासमोर आई तुळजाभवानी मातेची महाआरती व महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहेत. तर सुरतगाव येथील वीट भट्टीवरील पर जिल्ह्यातील कामगारांच्या मुलांना कपडे व खाऊ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. तसेच परंडा येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. तर पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले आहे. तसेच वाशी येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात येणार आहे. तर धाराशिव शहरातील शासकीय जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व कुष्ठधाम येथील नागरिकांना फळे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच अनाथ मुलांसाठी काम करणाऱ्या भूम तालुक्यातील पाथरूड येथील आपुलकी वस्तीगृहामध्ये १ क्विंटल गहू, १ क्विंटल तांदूळ १ महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक वस्तूंचा किराणा वस्तीगृहासाठी १ गॅस कनेक्शन मोफत देण्यात येईल. यासोबतच लोहारा येथील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात येणार आहेत.