आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा २० मे रोजी प्रतिष्ठान भवन येथे जनता दरबार

0

आ. राणाजगजितसिंह पाटील यांचा २० मे रोजी प्रतिष्ठान भवन येथे जनता दरबार

 Dharashiv :- 
जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत उद्या दिनांक 20 मे 2024 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान प्रतिष्ठान भवन, धाराशिव येथे जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे.

पिण्याचे पाणी, जनावरांना चारा, प्रलंबित विकास कामे, महावितरणच्या अडचणी, मनरेगाची कामे, दुष्काळी अनुदान यासह इतर अडचणींची सोडवणूक करण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी नागरिकांनी आपल्या काही अडचणी असल्यास उद्या प्रतिष्ठान भवन येथे उपस्थित रहावे, असे आवाहन आ. राणाजगजीत सिंह पाटील यांनी केले आहे.


जाहिरात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top