धाराशिव,दि १५ ( प्रतिनिधी )
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे.निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.तर २३ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.
२२ ऑक्टोबर २०२४ मंगळवार
निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे.या दिवसापासूनच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात होणार आहे.२९ ऑक्टोबर २०२४ रोजी मंगळवारपर्यंत नामनिर्देशन पत्रे सादर करण्याची अंतिम मुदत आहे.
बुधवार ३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार आहे.उffमेदवाराना सोमवार ४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.बुधवार दि.२० नोव्हेंबर रोजी जिल्हयातील १५२३ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.२३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यानंतर दि.२५ नोव्हेंबर रोccजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे.