धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर 241 विधानसभा मतदारसंघातून भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना 2024 विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दिल्याने पुन्हा एकदा राणा दादा असे कार्यकर्त्यांकडून स्टेटस ठेवत जल्लोष साजरा करण्यात येत आहे.
धाराशिव विधानसभेसाठी आमदार राणाजगजितसिंह सिंह पाटील यांचे नाव चर्चेत होते मात्र या चर्चेला पूर्णपणे विराम मिळाला असून तुळजापूर विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून आमदार राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे महाराष्ट्रातून 99 उमेदवारांचे पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये 88 वी क्रमांक तुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव या यादीत आहे.
महायुती मधील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे मात्र महाविकास आघाडी कडून मात्र अजून उमेदवार जाहीर झालेला नाही तर वंचित बहुजन आघाडी कडून डॉक्टर स्नेहा सोनकाटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठे राजकीय घडामोडी घडणार आहेत कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अशोक जगदाळे यांना उमेदवारी न मिळाल्यास ते बंडखोरी करत अशी चर्चा सर्व मतदार संघात आहे. ही जागा महाविकास आघाडीमध्ये जर काँग्रेसला सुटली तर मधुकर चव्हाण यांची एकनिष्ठ म्हणून वर्णी लागणार असल्याचे मतदारसंघातून बोलले जात आहे.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुती , वंचित बहुजन आघाडी व तिसरी आघाडी , व अपक्ष अशी लढत रंगणार आहे असे सध्या या मतदारसंघाचे चे चित्र दिसत आहे. अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे हे देखील मतदारसंघात सर्व ठिकाणी गावभेट व गाठीभेटी घेत नागरिकांचे प्रश्न जनतेसमोर आणत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या उमेदवारांनी मात्र उमेदवारी जाहीर होणे अगोदरच काहींनी आपले माघार घेतली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सर्व बातम्यांचा आढावा आम्ही आपल्यापर्यंत नेहमी पोहोचविणार आहोत त्यासाठी आमच्या उस्मानाबाद न्यूज व्हाट्सअप समूहात सहभागी व्हा लिंक - उस्मानाबाद न्युज वाटस्प समुह