धाराशिव दि ०५ ( प्रतिनिधी ) येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात ६६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.आज ४ नोव्हेंबर रोजी नामांकन अर्ज मागे घेण्याच्या दिवशी ९८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली.सर्वाधिक २३ उमेदवार तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या २४० - उमरगा विधानसभा मतदारसंघात १० उमेदवार निवडणूक रिंगणात असून १८ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेऊन निवडणुकीतून माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवाराचे नाव,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे. श्री.ज्ञानराज चौगुले शिवसेना (शिंदे गट) - धनुष्यबाण,श्री.प्रवीण स्वामी शिवसेना (उबाठा) - मशाल,श्रीमती सुनंदा रसाळ बहुजन समाज पार्टी- (हत्ती), राम गायकवाड वंचित बहुजन आघाडी -(गॅस सिलेंडर),शिवप्रसाद काजळे,मराठवाडा मुक्ती मोर्चा (ऑटो रिक्षा), सातलिंग स्वामी, प्रहार जनशक्ती पार्टी -( बॅट ),संदीप कटबु, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रोड रोलर), अजयकुमार देडे,अपक्ष - (ट्रंपेट), उमाजी गायकवाड,अपक्ष - (टेबल) व श्रीरंग सरवदे,अपक्ष (शिट्टी)
२४१- तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली असून आता २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार, त्यांचा पक्ष आणि चिन्ह कंसात पुढीलप्रमाणे.कुलदीप धीरज कदम पाटील, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस - (हात),राणा जगजीतसिंह पाटील,भारतीय जनता पार्टी- (कमळ),अण्णासाहेब दराडे,प्रहार जनशक्ती पार्टी-बॅट,शब्बीर सल्लाउद्दीन तांबोळी,ऑल इंडिया मजलीस ए इन्कीलाब ई मिल्लत, (एअर कंडिशनर),धनंजय मुरलीधर तर्कसे पाटील,राष्ट्रीय समाज पक्ष- (शिट्टी),धीरज पंडित पाटीलआदर्श संग्राम पार्टी (लिफाफा),भैयासाहेब नागटिळे,आझाद समाज पार्टी (कांशीराम) -किटली, देवानंद रोचकरी, समाजवादी पार्टी- (सायकल), शरद पवार,संभाजी ब्रिगेड पार्टी (टिलर), सचिन शेंडगे,जनहित लोकशाही पार्टी (कपाट),डॉ.स्नेहा सोनकाटे,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),अमीर इब्राहिम शेख,अपक्ष (दूरध्वनी ),अमेर सरदार शेख,अपक्ष (संगणक),उज्वला गाटे,अपक्ष (बॅटरी टॉर्च), काकासाहेब राठोड,अपक्ष (अंगठी), योगेश शंकर केदार,अपक्ष (टेबल), तात्या पंढरीनाथ रोडे,अपक्ष (स्नॅपर), दत्तात्रय कदम,अपक्ष (ऑटो रिक्षा), धनाजी हुबे, अपक्ष (स्टम्प्स) अँड.पूजा देडे,अपक्ष (हिरा), मन्सूर अहमद मकसूद शेख,अपक्ष (जहाज),गणेश रोचकरी,अपक्ष (ट्रंपेट), सत्यवान सुरवसे,अपक्ष,द्राक्षे
२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ३१ उमेदवारांनी माघार घेतली असून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.यामध्ये अजित पिंगळे, शिवसेना (शिंदे गट)- धनुष्यबाण,कैलास घाडगे पाटील, शिवसेना (उबाठा)- मशाल, देवदत्त मोरे,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, (रेल्वे इंजिन), लहू खुणे, बहुजन समाज पार्टी, (हत्ती),प्रणित डिकले,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),डॉ.रमेश बनसोडे, भारतीय जनविकास आघाडी,(ऑटो रिक्षा),सिराज उर्फ पापा सय्यद,टिपू सुलतान पार्टी (किटली),श्रीहरी माळी, राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी), अशोक कसबे, अपक्ष (कोट),दत्ता तुपे,अपक्ष (सफरचंद), नितीन काळे,अपक्ष (भेंडी) व विक्रम काळे, अपक्ष (विजेचा खांब)
२४३ - परांडा विधानसभा मतदारसंघातून २१ उमेदवारांनी माघार घेतली असून २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.यामध्ये निवडणूक लढविणारे उमेदवार,पक्ष व चिन्ह पुढीलप्रमाणे आहे.प्रा.डॉ.तानाजी सावंत (शिवसेना शिंदे गट),- धनुष्यबाण,महादेव लोखंडे,बहुजन समाज पार्टी (हत्ती), राजेंद्र गपाट,महाराष्ट्र नवनिर्माण सेना( रेल्वे इंजिन),राहुल मोटे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट (तुतारी वाजवणारा माणूस), आर्यनराजे शिंदे,राष्ट्रीय समाज दल (आर)- अंगठी,प्रवीण रणबागुल,वंचित बहुजन आघाडी (गॅस सिलेंडर),डॉ.राहुल घुले, राष्ट्रीय समाज पक्ष (शिट्टी),ऍड.रेवन भोसले,समाजवादी पार्टी (सायकल), शाहाजहान पैगंबर शेख, बहुजन महापार्टी (हिरा),अरुण जाधवर,अपक्ष (किटली), असिफ जमादार,अपक्ष(गळ्याची टाय), गुरुदास कांबळे,अपक्ष (चपला), जमीलखा पठाण,अपक्ष (ट्रंपेट),दिनेश मांगले,अपक्ष, (ऊस शेतकरी),विनयराज देशमुख,अपक्ष (ऑटो रिक्षा),नुरजहा सोहेल शेख,अपक्ष (प्रेशर कुकर ),बंडू पोळ,अपक्ष (रोड रोलर),राहुल मोटे,अपक्ष (ग्रामोफोन), लक्ष्मीकांत आटूळे,अपक्ष (चिमणी), सोमनाथ कदम,अपक्ष (डंबेल्स) व संभाजी शिंदे,अपक्ष (एअर कंडिशन्स) या उमेदवारांचा समावेश आहे.