वै.श्रीसंत आश्रम मंदिर व सस्ते बप्पा वारकरी व अनुलोम संस्थेच्या वतीने तिर्थदर्शन व सन्मान सोहळा कार्यक्रम संपन्न ., येडशी येथे समरसता कार्यक्रम संपन्न .

0

धाराशिव : 
(प्रतिनिधी ) येडशी येथील श्रीसंत रामकृष्णभऊ, भगवानभऊ,परमेश्वर महाराज आश्रम मंदिर व मृदंगाचार्य जालिंदर (बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळ येडशी तसेच व अनुलोम संस्थेच्या वतीने समरसता हा कार्यक्रम त्याच प्रमाणे मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती धाराशिव सन्मानीत सन्मानपत्र सोहळा कार्यक्रम दि ३ सोमवार रोजी गोरखमुहूर्त  वेळ ५:३० ते ७ या वेळेत मोठ्या उत्सहात संपन्न झाला .
समरसता या प्रमाणे गावातील सर्वस्थरातील जाती धर्माच्या श्री व सौ या जोडप्यांच्या हस्ते महाकुंभ तिर्थपुजन व दर्शनविधी पार पडला .तिर्थ कलश येडशी येथील सिध्देश्वर मंदिर  ते श्रीसंत आश्रम मंदिर पर्यंत टाळ मृदंगाच्या गजरात नेण्यात आला .
यावेळी गावचे प्रथम नागरीक म्हणून सरपंच डॉ .सोनिया पवार ,ग्रा.सदस्य प्रशांत पवार ,ॲड धैर्यशील सस्ते,मकरंद पाटिल यांचि उपस्थिती होती . 
सदर महाकुंभ तिर्थ  अनुलोम संस्थेच्या वतीने याठीकाणी आणण्यात आले हे तीर्थ जिल्हा समन्वयक राहुल कुलकर्णी, अक्षय माडेकर यांच्या समावेत पदाधिकारी तीर्थ घेऊन आले होते .हा कार्यक्रम येडशी येथील श्री संत आश्रम मंदिर येथे पार पडला .

वारकरी संस्थेच्या विद्यार्थी वर्ग व कलावंत संघाचा सन्मान.

यावेळी आश्रम मंदिर व सस्ते (बप्पा ) वारकरी सेवा मंडळाच्या विद्यार्थी वर्ग व सहभागी कलावंतांनी १९ फेब्रुवारी २०२५ रोजी धाराशिव येथील शिवजयंती  उत्सव समितीच्या सन्मानपत्राचे वितरण करण्यात आले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आश्रम मंदिराचे सेवा प्रमुख व सस्ते बप्पा वारकरी संस्थेचे सचिव संस्थापक श्री महादेव सस्ते , शिवभक्त हेमंत पवार , आशोक देशमुख ,श्रीहारी मेटे,सतिश कुंभार, नवनाथ राऊत सौ .प्रतिमा सस्ते ,बालाजी नकाते यांनी कार्यक्रम यशस्वीसाठी परीश्रम घेतले तर सुत्रसंचलन  सौ प्रतिमा सस्ते यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top