सहा वर्षीय अरिबा हैदर पठाणने पहिला रोजा केला पूर्ण
मार्च ०५, २०२५
0
धाराशिव (प्रतिनिधी) - सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात व हज ही पाच प्रमुख तत्व आहेत. धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर येथील ६ वर्षीय अरिबा हैदर पठाण हिने पहिल्याच दिवशी दि.३ मार्च रोजी रोजा पुर्ण केला आहे.
यावर्षी रमजान महिना कडक उन्हात आला असून आई वडीलांकडे अरिबा रोजा धरण्याचा अटहास धरला. मात्र कडक ऊन असल्यामुळे रोजा धरू नको असे सांगत नकार दिला. मात्र अरिबा हिने रोजा धरायचाच निश्चय केल्यामुळे आई-वडिलांनी तिला परवानगी दिली. तर अरिबाने दिवसभर पाण्याचा एक थेंबही न पिता व काहीही न खाता नमाजासह रोजा पूर्ण केला. त्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा