मित्र ' संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार

0
मित्र ' संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार

धाराशिव, दिनांक 23 -
महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन 'मित्र' या राज्याच्या आर्थिक व धोरणात्मक दिशा ठरविणाऱ्या महत्वपूर्ण संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ,  लघु उद्योग भारती व सहकार भारती यांच्या वतीने आमदार राणाजगजितसिह पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य कँटचे उपाध्यक्ष संजय मंत्री, ॲड. मिंलिद पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव, सचिव महेश वडगावकर, अमित शिंदे, आशिष मोदानी, नितीन फंड, विशाल थोरात, राधेश्याम बजाज, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष डॉ. हर्षल डंबळ, महादेव केसकर, सुनील गर्जे, पी आर काळे, संजय देशमाने, मदन कुलकर्णी, राजाभाऊ कोडारी, संजय शेटे, मदन पवार, संगमेश्वर स्वामी, तानाजी डोंबारी, एस. आर. खटिंग, श्यामभाऊ भन्साळी, नितीन नायर, व्यापारी महासंघाचे संघटन सचिव तथा सहकार भारतीचे महामंत्री अभिलाष लोमटे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top