google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवसेनेचा "गाव तिथे शाखा" उपक्रम तालुक्यात धडाक्यात सुरूच;एका दिवसात सहा गावांमध्ये शाखा उद्घाटन

शिवसेनेचा "गाव तिथे शाखा" उपक्रम तालुक्यात धडाक्यात सुरूच;एका दिवसात सहा गावांमध्ये शाखा उद्घाटन

0
तुळजापूर:शिवसेनेच्या "गाव तिथे शाखा" या महत्वाकांक्षी उपक्रमाला तुळजापूर तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळत असून, तब्बल एका दिवसात सहा गावांमध्ये शाखा उद्घाटन करून शिवसेनेने तालुक्यात आपली राजकीय ताकद ठसवली आहे.

पक्षप्रमुख मा. एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने तसेच पक्षाचे सचिव संजय मोरे,धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेनेचे उपनेते ज्ञानराज चौगुले,धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे आणि तुळजापूर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ढेकरी,शिराढोण,कात्री,कामठा,जवळगा मेसाई व वडगाव देव या सहा गावांमध्ये भव्य दिव्य पद्धतीने शाखा उद्घाटन करण्यात आले.

या शाखा उद्घाटन कार्यक्रमांमध्ये संबंधित गावातील शाखाध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव,कोषाध्यक्ष,सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण कार्यक्रमात स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.

आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने तालुक्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये आपली संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचे चित्र आहे.

शाखा उद्घाटन प्रसंगी तुळजापूर शहराध्यक्ष बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते,युवा नेते सौरभ भोसले,शिवाजी हाके,स्वप्निल सुरवसे,धर्मराज पवार,संजय लोंढे,नितीन मस्के,मोहन भोसले,भुजंग मुकेरकर,रितेश जवळेकर,संभाजी नेपते,मीना सोमजी,रेणुका शिंदे,राधा घोगरे आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे संपूर्ण तालुक्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, विरोधकांमध्ये स्पष्टपणे भीतीचे वातावरण पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर घेतलेली ही आक्रमक भूमिका आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top