google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 पत्रकार रज्जाक शेख यांच्या कार्याचा राष्ट्रीय गौरव – "भारत भूषण पुरस्कार" प्रदान

पत्रकार रज्जाक शेख यांच्या कार्याचा राष्ट्रीय गौरव – "भारत भूषण पुरस्कार" प्रदान

0
पुणे दि.२५ ऑगस्ट 
समाजकारण व पत्रकारिता या दोन्ही क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रज्जाक साहेबलाल शेख यांना राष्ट्रीय भारत भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा भव्य सोहळा दि. २४ ऑगस्ट रोजी पुण्यातील भारत इतिहास संशोधक मंडळ येथे पार पडला.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता बाळराजे वाळुंजकर, प्रबोधनकार सचिन देवरे, अभिनेत्री भक्ती साधू, ॲड. उमाकांत आदमाने तसेच हिमांशू जैन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रज्जाक शेख यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार स्विकारताना रज्जाक शेख यांनी सांगितले की, “पत्रकारिता ही केवळ वृत्तांकनाची जबाबदारी नसून समाजातील दुर्लक्षित घटकांचा आवाज बनण्याचे काम आहे. मला मिळालेला हा सन्मान माझ्या एकट्याचा नसून समाजासाठी केलेल्या एकत्रित कार्याचा गौरव आहे.”

या वेळी प्रमुख पाहुण्यांनीही आपले विचार मांडले. अभिनेता बाळराजे वाळुंजकर म्हणाले की, “पत्रकारांनी सामाजिक भान ठेवून केलेले काम समाज परिवर्तनाला गती देते. रज्जाक शेख यांच्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे.” प्रबोधनकार सचिन देवरे यांनी त्यांच्या लिखाणातील प्रबोधनकारी बाजूची प्रशंसा केली. अभिनेत्री भक्ती साधू यांनी सामाजिक क्षेत्रात पत्रकारांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर प्रकाश टाकला. तर ॲड. उमाकांत आदमाने आणि हिमांशू जैन यांनीही त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन साऊ ज्योती सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष सचिन हळदे व सहआयोजक विकास उबाळे व पत्रकार सचिन सोनकांबळे, दिपक राणे जहीर पटेल यांनी या सोहळ्याचे संयोजन केले होते.

कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार वितरणानंतर उपस्थितांनी रज्जाक शेख यांचे अभिनंदन करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top