google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 महसुली कामात धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला पाहिजे - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजाऱ , भूम येथे जिल्हास्तरीय महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा

महसुली कामात धाराशिव जिल्हा राज्यात अग्रेसर राहिला पाहिजे - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजाऱ , भूम येथे जिल्हास्तरीय महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा

0


धाराशिव -महसूल विभागातील
कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजास प्रथम प्राधान्य द्यावे. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाजा सोबतच आपल्या कुटूंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाच्या कार्यात धाराशिव जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला पाहिजे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले. ते भूम येथे सोमवारी (दि.४) आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.



भूम येथील रामहरी मंगल कार्यालयात जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दि. ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरिय महसूल दिन उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावेळी महसूल विभागामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शिपाई पासून उपजिल्हाधिकारी पर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाले  की, महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाच्या कार्यात धाराशिव जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला पाहिजे. त्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे. 

कार्यक्रमास जिल्हाधिकारी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सौम्यश्री पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैंनक घोष, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, भूमचे प्रभारी पाटील, धाराशिवचे उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, धाराशिवच्या तहसीलदार डॉ.
मृणाल जाधव, तहसीलदार जयवंतराव पाटील, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायव तहसीलदार, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल व महसूल विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात महसूल विभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यामध्ये ५ ग्राम महसूल अधिकारी यांची मंडळ अधिकारीपदी, ७ शिपायांची सहाय्यक पदावर, तर २ मंडळ अधिकारी यांची नायब तहसीलदार पदावर पदोन्नती करण्यात आली. तसेच वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३ अधिकारी, ३९ कर्मचारी आणि ६ पाल्यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार व अभिनंदन करण्यात आले.

 हरित धाराशिव अभियान व आकांक्षित जिल्हा योजनेत विशेष कामगिरी करणाऱ्यांनाही गौरवण्यात आले. कर्मचारी तणाव दूर करण्यासाठी हास्यरंग फेम दीपक देशपांडे यांचा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शोभा जाधव यांनी केले. सूत्रसंचालन मृणाल जाधव यांनी तर आभार तहसीलदार जयवंत पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाचे आयोजन तहसील कार्यालय भूम व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. यावेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी आपली
मनोगते व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top