google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शिंगोली येथे जि.प. शाळेत आय ए एस प्रशिक्षणार्थ्यानी घेतला शैक्षणिक कामांचा आढावा

शिंगोली येथे जि.प. शाळेत आय ए एस प्रशिक्षणार्थ्यानी घेतला शैक्षणिक कामांचा आढावा

0
धाराशिव : 

 तेलंगणा राज्यातील डॉक्टर एम सी आर मानव संसाधन विकास संस्थेतील भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस (पाच) प्रशिक्षणार्थींच्या 1.डॉ. रिंकू मीना 2.डॉ प्रग्या ठाकूर 3. डॉ आहाना सृष्टी,4.उधम पटेल, 5.राहतबाज अली यांच्या पथकाने मंगळवार दिनांक 4 रोजी तालुका धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगोली येथे अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली.
               यावेळी पथकाने जिल्हा परिषद शाळेतील कामकाजाची आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला व विद्यार्थ्यांशी हितगुज केले.इयत्ता 5 वी च्या विदयार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत गीताने स्वागत केले.
           हा दौरा प्रशिक्षणार्थींच्या प्रशासकीय प्रशिक्षणाचा एक भाग होता.याद्वारे त्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर शालेय शैक्षणिक कामकाज कशा प्रकारे चालते हे अनुभवता आले.
      यावेळी पंचायत समिती बीडीओ नलावडे साहेब, बी इ ओ असरार साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी बापू शिंदे, येडशी बीटचे विस्तार अधिकारी श्री पारवे साहेब, केंद्रप्रमुख श्रीमती वाघमारे मॅडम, समावेशित शिक्षण च्या वाघमारे मॅडम, शा. व्य समिती अध्यक्ष सचिन वाघमारे, गावातील सरपंच योगिताताई राहुल शिंदे, आशा कार्यकर्त्या अलकाताई मगर, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य तसेच गावातील शिक्षण प्रेमी नागरिक व पालक, पिरामल फौंडेशन टीम, मुख्याध्यापक श्री राऊत सर,शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक कर्मचारी श्री पायाळ व श्रीमती पाटील, हावळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top