इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे परंडा तालुक्यातील गोसावीवाडी (आंबी) येथील कु.मोक्षदा कालिदास उपासे इ. 12 वी (कला) 90.92 % गुण घेऊन तालुक्यातुन प्रथम तसेच, कु.आदित्य शत्रुघ्न खोत इ.10 वी (CBSE) पोदार इंटरनॅशनल स्कुल, सोलापूर येथुन प्रथम क्रमांक मिळविल्या बद्दल सत्कार केला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, तुळजापूर तालूकाध्यक्ष संतोष बोबडे, रमेश पवार, अनिल पाटील, ब्रम्हदेव उपासे, आदी, उपस्थित होते.