उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे बुधवारी आयोजन

0
इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा विचार प्रसारक मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उस्मानाबाद यांच्या वतीने शहरात
 दि. 22 जुलै 2020 रोजी उस्मानाबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह  उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये रक्तसाठा कमी आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अजितदादा विचार प्रसारक मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. सह्याद्री ब्लड बँकेच्या सहकार्याने छत्रपती शिवाजी महाराज चौक उस्मानाबाद येथे दि. 22 जुलै रोजी सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.00 या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात जास्तीत जास्त दात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदान करावे, असे आवाहन संयोजक नंदकुमार प्रतापराव गवारे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top