“मोटार वाहन कायदा अंतर्गत 212 कारवाया- 43,000 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”
उस्मानाबाद जिल्ह्यातील महत्वाच्या रस्त्यांवर दि. 09.09.2020 रोजी 18 पोलीस ठाणी व उस्मानाबाद शहर वाहतुक शाखा यांनी मोटार वाहन कायदा अंतर्गत 212 कारवाया करुन 43,000 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.
“मनाई आदेशांचे उल्लंघन: 36 कारवायांत 7,800/-रु. दंड वसुल.”
उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द जिल्हाभरात पोलीस ठाणे स्तरावर दि.08 व 09.09.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.
1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 34 कारवायांत- 6,800/- रु. दंड प्राप्त.
2)सार्वजनिक स्थळी मास्क न वापरने: 02 कारवायांत- 1,000/- रु. दंड प्राप्त.
“जुगार विरोधी कारवाई”
पोलीस ठाणे, उमरगा: संजय रायाप्पा ममाळे, रा चिंचोली (जा.), ता. उमरगा हा दि. 09.09.2020 रोजी गावातील मोरया कापड दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व रोख रक्कम 830/-रु. बाळगला असतांना पो.ठा. उमरगा यांच्या पथकास आढळला.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: 1)शाहुराज खंडु सुर्यवंशी 2) उमेश प्रकाश शिरगिरे 3) लालडु दस्तगीर पिंजारी, तीघे रा. अणदुर, ता. तुळजापूर हे तीघे दि. 09.09.2020 रोजी अणदुर येथील लालडु पिंजारी यांच्या शेतात तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्य व रोख रक्कम 1,510/-रु. बाळगले असतांना पो.ठा. नळदुर्ग यांच्या पथकास आढळले.
यावरुन नमूद आरोपीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.
“अवैध मद्य विरोधी कारवाई”
स्थानिक गुन्हे शाखा: अविराज व्यंकट जाधव, रा. दाळींब ता. उमरगा हा दि. 09.09.2020 रोजी गावातील संदीप कांबळे यांच्या दुकानासमोर देशी- विदेशी दारुच्या 42 बाटल्या (किं.अं. 4,296/-रु.) अवैधपणे बाळगला असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळला. यावरुन पथकाने अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी करतांना चोर दुकान मालकाच्या ताब्यात”
पोलीस ठाणे, येरमाळा: आश्रुबा राऊत, रा. वाघोली, ता. कळंब यांचे घरालगतच छोटेसे चप्पल दुकान आहे. दि. 10.09.2020 रोजी रात्री 02.00 वा. सु. दुकानाजवळ संशयास्पद आवाज आल्याने त्यांनी तेथे जाउन पाहिले. यावेळी गावातीलच राजेंद्र घोंगडे हा दुकानाचे कुलूप तोडून दुकानतील चप्पल- बुट जोड असा सुमारे 5,560/-रु. माल चोरुन नेत होता. आश्रुबा राऊत यांनी त्यास पकडून येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले. अशा मजकुराच्या आश्रुबा राऊत यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“चोरी”
पोलीस ठाणे, तुळजापूर: सुवर्णा इंगळे, यांच्या तुळजापूर शहरातील ‘जिजाऊ मेडीकल्स’ च्या शटरचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने दि. 10.09.2020 रोजी पहाटे तोडून मेडीकलच्या गल्ल्यातील सुमारे 20,000/-रु. रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या सुवर्णा इंगळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, नळदुर्ग: महादेव कुताडे, रा. फुलवाडी, ता. तुळजापूर यांनी आपली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 2561 ही दि. 30.08.2020 रोजी रात्री 11.00 वा. घरासमोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव कुताडे यांनी दि. 10.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, शिराढोण: सुखदेव मुळे, रा. माळकरंजा, ता. कळंब यांनी आपली स्प्लेंडर प्लस मो.सा. क्र. एम.एच. 25 व्ही 7583 ही दि. 08.09.2020 रोजी रात्री 11.30 वा. घरासमोर लावली होती. ती दुसऱ्या दिवशी सकाळी लावल्या ठिकाणी आढळली नाही. यावरुन अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या सुखदेव मुळे यांनी दि. 10.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
पोलीस ठाणे, उमरगा: अमर जगन्नाथ लोहार, रा. महादेव गल्ली, उमरगा यांनी तानाजी विठ्ठलाप्पा जाधवा, रा. तुरोरी, ता. उमरगा यांच्या रोपवाटीकेत 16 टिप्पर मुरुम टाकला होता. या कामाचे काही पैसे तानाजी जाधवा यांनी अमर लोहार यांना दिले होते. उर्वरीत राहीलेले पैसे अमर लोहारा यांनी मागणी केले असता तानाजी जाधव यांनी त्यांना शिवीगाळ केली. दि. 09.09.2020 रोजी 14.30 वा. सु. अमर लोहार हे उमरगा येथील रत्नदीप अर्थमुव्हर्स कार्यालया समोर थांबले होते. यावेळी तानाजी जाधवा यांनी तेथे येउन रत्नदीप अर्थमूव्हर्स चे मालक- रतन माळी यांच्या इनोव्हा कारची काच लोखंडी हातोड्याने फोडून कारचे नुकसान केले. तसेच अमर लोहारा यांची गचांडी धरुन त्यांच्या खीशातील 15,000/-रु. काढून घेउन गेला. अशा मजकुराच्या अमर लोहार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 327, 427, 323, 504 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, कळंब: आपल्या मुलांस धक्काबुक्की केल्याचा जाब संतोष दिलीप पिंगळे, रा. पाथर्डी, ता. कळंब यांनी दि. 08.09.2020 रोजी गावातील किराणा दुकानासमोर भाऊबंद- भास्कर गोविंद पिंगळे यांना विचारला. यावर चिडुन जाउन भास्कर पिंगळे यांनी मुलगा- शुभम याच्या सहकार्याने संतोष पिंगळे यांना दगडाने मारहाण करुन जखमी केले. वडीलांस वाचवण्यास आलेल्या सुमित व सुजित यांनाही नमूद दोघांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन धमकावले. अशा मजकुराच्या संतोष पिंगळे यांनी दि. 09.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलीस ठाणे, मुरुम: संजुबाबा व राजेंद्र लक्ष्मण सातपुते, रा. दाळींब, ता. उमरगा या दोघा भावांत वडीलोपार्जीत शेती- संपत्ती वाटपावरुन वाद आहे. यातूनच चिडून जाउन दि. 09.09.2020 रोजी राजेंद्र यांसह त्यांच्या कुटूंबीयांनी संजुबाबा सातपुते यांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी व फरशीने मारहाण केली. यात संजुबाबा यांच्या डोक्यास जखम झाली. अशा मजकुराच्या संजुबाबा सातपुते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.