google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेेेची कारवाई : 4 गुन्ह्यांतील आरोपी मुद्देमालासह ताब्यात

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेेेची कारवाई : 4 गुन्ह्यांतील आरोपी मुद्देमालासह ताब्यात

0


उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेेेची कारवाई : 4 गुन्ह्यांतील आरोपी मुद्देमालासह ताब्यात

उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा: मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री संदीप पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या पथकातील पोउपनि- श्री पांडुरंग माने, सदानंद भुजबळ, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, महेश घुगे, संतोष गव्हाणे, पोकॉ- दिपक लाव्हरेपाटील, पांडुरंग सावंत, आरसेवाड, अविनाश मारलापल्ले, महिला पोकॉ- होळकर यांचे पथक मालाविरुध्दच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते. मिळालेल्या गोपनीय खबरेवरुन पथकाने दि. 26.11.2020 रोजी आरोपी- दत्ता आत्माराम कांबळे, रा. सांजा, ता. उस्मानाबाद यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून बेंबळी पोलीस ठाणे गु.र.क्र. 86 / 2020 मधील चोरीस गेलेल्या 8 बोकडांपैकी 6 बोकड व बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 159 / 2020 मधील चोरीस गेलेले 2 बोकड असे एकुण 8 बोकडांसह गुन्ह्यात वापरलेली ह्युंडाई सॅन्ट्रो कार जप्त केली आहे.


            तर दुसऱ्या घटनेत आकाश संभाजी चव्हाण, वय 27 वर्षे, रा. करकम, बादलकोट, ता. पंढरपूर यास आज दि. 27.11.2020 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून उमरगा पो.ठा. गु.र.क्र. 375 / 2020 या लुटमारीच्या गुन्ह्यातील 5 ग्रॅम सोन्याच्या मंगळसुत्रासह 45,000 ₹ रोख रक्कम व मुरुम पो.ठा. गु.र.क्र. 218 / 2020 या लुटमारीच्या गुन्ह्यातील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने व 10,000  ₹ रोख रक्कम जप्त केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top