उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तुळजापूर: महादेव ग्यानदेव रोचकरी, रा. तुळजापूर (धाकटे) यांनी त्यांची हिरो पॅशन प्रो मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्स 1799 ही दि. 04.12.2020 रोजी 15.30 वा. सु. तडवळा शिवारातील स्वत:च्या शेत रस्त्यालगत ठेवलेली असतांना अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या महादेव रोचकरी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तुळजापूर: बालाजी खंडु भराडे, रा. मंगरुळ, ता. कळंब यांनी दि. 30.11.2020 रोजी 07.00 वा. सु. तुळजापूर येथील सराय धर्मशाळे जवळ कार लावली होती. यावेळी त्या कारच्या खिडकीच्या काचा सरकवून आतील कपड्यांच्या दोन पिशव्या व रिअलमी मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या बालाजी भराडे यांनी आज दि. 05.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.