उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, उमरगा: मधुकर मारुती केशवे, रा. मुळज, ता. उमरगा हे दि. 05.12.2020 रोजी 14.00 वा. सु. मुळज शिवारातील शेतात सामाईक कुपनलीकेचे पाणी आनण्यासाठी गेले होते. यावेळी भाऊबंद- परमेश्वर सुधाकर केशवे व किशोर सुधाकर केशवे या दोघां भावांनी पाणी नेन्याच्या वादावरुन मधुकर केशवे यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण करुन जखमी केले व ठार मरण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मधुकर केशवे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, उस्मानाबाद (श.): 1)रंजीत शहाजी करवर 2)संदीप शंकर करवर 3)शंकर विठ्ठल करवर 4)भालचंद्र शहाजी करवर, सर्व रा. राघुचीवाडी, ता. उस्मानाबाद यांनी तानाजी पांडुरंग पाटील, यांना दि. 05.12.2020 रोजी 09.30 वा. सु. राघुचीवाडी बसस्थानकाजवळ शेतजमीनीच्या वादावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या तानाजी पाटील यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, उमरगा: कवठा, ता. उमरगा येथील मधुकर राजेंद्र सोनवणे यांच्या कुटूंबीयांचा अजित पांडुरंग सोनवणे यांच्या कुटूंबीयांशी दि. 06.12.2020 रोजी 01.43 वा. सु. शेतातील रहदारीच्या कारणावरुन राहत्या गल्लीत वाद झाला. यात दोन्ही कुटूंबीयांतील सदस्यांनी परस्परविरोधी गटांतील सदस्यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, कुऱ्हाडीने, दगड, काठीने मारहाण करुन जखमी करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या दोन्ही कुटूंबांतील सदस्यांनी दिलेल्या स्वतंत्र 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 143, 147, 148, 149, 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.