उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तुळजापूर: प्रदीप बाबुराव हंगरगेकर, रा. नळदुर्ग रोड, तुळजापूर यांनी घरासमोरील अंगणात ठेवलेली सोयाबीनची 6 पोती दि. 05.12.2020 रोजी रोजी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदीप हंगरगेकर यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तुळजापूर: शिवाजी रामचंद सोमाजी, रा. खटकाळ गल्ली, तुळजापूर यांनी टँकर क्र. एम.एच. 25 यु 599 हा लातुर- तुळजापूर रस्त्यावरील भवानीशंकर पेट्रोलियम विक्री केंद्रावर लावला होता. त्या टँकरची 6 चाके, एक्साईड कंपनीच्या 2 बॅटऱ्या व एक स्टार्टर असे साहित्य अज्ञात चोरट्याने दि. 05.12.2020 रोजी मध्यरात्री चोरुन नेले. अशा मजकुराच्या शिवाजी सोमाजी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, उमरगा: प्रभाकर माधवराव बिराजदार, रा. जकेकुर, ता. उमरगा यांच्या उमरगा चौरस्ता येथील ‘एमआरएफ टायर्स’ दुकानाचे शटर अज्ञात चोरट्याने दि. 04 व 05.12.2020 रोजी रात्री उचकटुन आतील ट्रक टायर- 10 नग, मोटारसायकल टायर- 10 व 9 ट्युब असा एकुण 2,10,850 ₹ चा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या प्रभाकर बिराजदार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद,पोलीस ठाणे, आनंदनगर: बाबा तानाजी पेठे, रा. समर्थनगर, उस्मानाबाद यांची हिरो स्प्लेंडर मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 3848 ही दि. 02.12.2020 रोजी 18.00 ते 19.45 वा. चे दरम्यान तुळजाभवानी स्टेडीयमच्या द्वाराजवळून अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या बाबा पेठे यांनी दि. 05.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद, पोलीस ठाणे, येरमाळा: प्रदिप सोमनाथ भोसले, रा. तेरखेडा, ता. वाशी यांनी युनिकॉर्न मो.सा. क्र. एम.एच. 25 एआर 9995 ही दि. 05.12.2020 रोजी 11.30 वा. सु. तेरखेडा येथील अरुण हॉटेल समोर लावली असता अज्ञात चोरट्याने ती चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रदिप भोसले यांनी आज दि. 06.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.