उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 5 ठिकाणी चोरी : गुन्हे दाखल 

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, मुरुम: गणेश मल्लीकार्जुन जोजन, रा. येणेगुर, ता. उमरगा हे दि. 07.12.2020 रोजी 15.00 वा. सु. येणेगुर येथील साप्ताहीक बाजारात गेले असता त्यांचा विवो एस- 1 भ्रमणध्वनी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या गणेश जोजन यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, आंबी: शरद वैजीनाथ हराळ, रा. नळी, ता. भुम यांचा अंतरवली शिवारातील तलावातील आर्या कंपनीचा पानबुडी विद्युतपंप दि. 07.12.2020 रोजी 17.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या शरद हराळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, ढोकी: काकासाहेब रामचंद्र हाजगुडे (पाटील), रा. किणी, ता. उस्मानाबाद यांनी किणी येथील शेतातील शेडमध्ये 42 पोती सोयाबीन ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने त्या शेडचे कुलूप दि. 06 व 07.12.2020 दरम्यानच्या रात्री तोडून ती पोती चोरुन नेली. अशा मजकुराच्या काकासाहेब हाजगुडे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 461, 380 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, तामलवाडी: अरुण शेळके, रा. सांगवी (काटी), ता. तुळजापूर यांच्या सांगवी (काटी) शिवार विहीरीतील लाडा लक्ष्मी कंपनीचा 5 अश्वशक्ती क्षमतेचा पाणबुडी विद्युत पंप दि. 04  व 05.12.2020 रोजी रात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा मजकुराच्या अरुण शेळके यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, उमरगा: भिमाशंकर सुरवसे, रा. उमरगा हे दि. 22.11.2020 रोजी 13.15 वा. सु. उमरगा येथील साप्ताहीक बाजारात गेले असता त्यांचा सॅमसंग ए-50 एस भ्रमणध्वनी गर्दीचा फायदा घेउन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या भिमाशंकर सुरवसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top