पेटीएम खात्याची केवायसी नावा खाली वाशी येथे 75 हजार रुपयांची फसवणूक
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, वाशी: उपजिल्हा रुग्णालय, वाशी येथे नोकरीस असलेल्या श्रीमती सोनाली तुकाराम गाढवे, यांना दि. 13.07.2020 रोजी भ्रमणध्वनीवर एका अज्ञात पुरुषाने, “मी विजय शर्मा बोलत असुन तुमच्या पेटीएम खात्याची केवायसी करुन ते अद्ययावत करा अन्यथा खाते बंद होईल. केवायसी करण्या करीता मी सांगीतल्या पध्दतीने भ्रमणध्वनीचा 10 ₹ रिचार्ज करा.” असे सांगीतले. यावर सोनाली गाढवे यांनी त्या अज्ञाताने सांगीतल्या प्रमाणे तसे केले असता सोनाली यांना त्यांच्या एसबीआय बँक खात्यातून 9,990 ₹ रक्कम कपातीचा संदेश आला. त्यानंतर लागोपाठ आलेल्या चार संदेशांद्वारे एकुण 75,000 ₹ रक्कम अन्य खात्यावर स्थलांतरीत झाल्याचे सोनाली गाढवे यांना समजले. अशा मजकुराच्या सोनाली गाढवे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.