भातागळी येथील जि.प.प्रा.शाळेत शिक्षकांच्या वतीने स्व-खर्चाने विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप

0

उस्मानाबाद :- जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भातागळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांनी स्व-खर्चाने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप केले. विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण दिले जात असले तरी ज्या विद्यार्थ्याकडे अॅंड्राॅईड मोबाईल नाही त्यांना वैयक्तिक अभ्यास दिला जात आहे.
 पालकानीही या उपक्रमाचे स्वागत केले आहे. यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक व्यंकट जगताप, शिक्षक कारभारी कोंडीबा, वैरागकर सुर्यकांत, दबडे तानाजी,श काळे शंकर या शिक्षकांनी सामाजिक भावना जपत स्व-खर्चातुन शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वाध्याय पुस्तिकेचे वाटप केले. यावेळी सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top