उस्मानाबाद/प्रतिनिधी
जाचक शेतकरी विधेयक कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी लोहारा शहर व तालुका बंद पाळुन या कायद्याचा विरोध करण्यात आला. लोहारा शहरातील शेतकऱ्यांनी शहरातील शिवाजी चौक, आंबेडकर चौक मार्गे ट्रॅक्टर द्वारे मोर्चा काढून तहसील कार्यालय पर्यंत जाऊन केंद्र सरकारने हा मंजूर केलेला विधेयक रद्द करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन लोहारा तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने घाई-घाईत कुठलीच चर्चा न करता मंजूर केलेले तिनीही कृषी विधेयक शेतकऱ्यांना व शेती व्यवसायांना संपुष्टात आणणारे असून, या विधेयकामुळे जगाचा पोशिंदा बळीराजा आर्थिक दृष्ट्या दुर्बल होऊन भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेती हा प्रमुख व्यवसाय संपुष्टात आणून उद्योग पतांच्या घशात घालण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. तरी हा कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी निवेदनात केली आहे. यावेळी विठ्ठल वचने पाटील, आयनोदिन सवार, दीपक मुळे, अविनाश माळी, अभिमान खराडे, श्रीनिवास माळी, अरिफ खानापुरे, हरी लोखंडे, दिलीप पाटील, दिलीप येलोरे, ओम पाटील, परमेश्वर चिकटे, शिवमूर्ती मुळे, जालिंदर कोकणे, प्रशांत होंडराव, काशिनाथ स्वामी, चिदानंद स्वामी, अमोल माळी, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.