केंद्र सरकारने शेती विषयक तीन कायदे पास केले असुन या कायद्याला पाठिंबा म्हणून लोहारा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन

0
केंद्र सरकारने शेती विषयक तीन कायदे पास केले असुन या कायद्याला पाठिंबा म्हणून लोहारा तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन 

लोहारा/प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेती विषयक तीन कायदे पास केले असुन या कायद्याला लोहारा तालुक्यातील  शेतकर्‍यांच्या वतीने जाहिर पाठिंबा देवुन तहसीलदार मार्फत पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नुकताच शेतकऱ्यांसाठी शेती विषयक ऐतिहासिक तीन कायदे पास केले आहेत. यामध्ये केंद्र सरकारने शेती हा मुळ गाभा धरुन शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, या कायद्यामध्ये शेतकऱ्याला शेती कराराने शेती करता येईल, त्या पिकाचा हामीभाव ठरवता येईल, तसेच शेतकऱ्याला स्वतः शेतमालाचा व्यापार करता येईल, दलाल आडते यांना बाजूला ठेवून शेतकरी आपला माल बाजारात विकु शकेल. शेतकऱ्याला शेती मालाची साठवण करून योग्य वेळी बाजारात विक्री करता येईल. यासाठी या कायद्यामध्ये तरतुद करण्यात आली. पण काही संधी साधू दलाल, अडते यांचे समर्थक हा कायदा न वाचताच आपला स्वार्थ साधून घेत आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी हा जो शेतीविषयक कायदा पास करुन शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. या ऐतिहासिक कायद्याला लोहारा शहर व तालुका सर्व शेतकरी बांधवांचा  जाहीर पाठिंबा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर बाबुराव घाडगे, संतोष गव्हाळे, प्रसन्न एकोंडे, युवराज जाधव, बळीराम दंडगुले, संतोष पाटील, अंबादास पवार, बसवराज कोंडे, बंकटसिंग बायस, गहीनाथ कागे, बसवराज बिडवे, ओम गव्हाळे, देवेंद्र पाटील, मुकेश मुळे, राजू पांढरे, बळीराम दंडगुले, यांच्यासह शहरातील व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top