गोवंश कत्तलखान्यावर छापा, गुन्हा दाखल.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, भुम: भुम शिवारातील गट क्र. 394 मधील शेतात अवैध गोवंशीय कत्तलखाना असल्याची माहिती परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक श्री ऋषीकेश रावळे यांना मिळाली होती. यावर त्यांच्यासह भुम पो.ठा. चे पो.नि. श्री रामेश्वर खनाळ, पोलीस अंमलदार व मानद पशु कल्याण अधिकारी- धन्यकुमार पटवा यांच्या पथकाने सदर ठिकाणी दि. 07.12.2020 रोजी 20.15 रोजी छापा टाकला. यावेळी 1)नदीम नजीर कुरेशी 2)शोदाब नजीर कुरेशी 3)रौफ उस्मान सौदागर 4)शकिल बाशु शेख 5)समशेर बादशहाखॅ पठाण, सर्व रा. कुरेशी गल्ली, भुम यांच्या ताब्यात सुमारे 355 कि.ग्रॅ. गोवंशीय मांस, कत्तल साहित्य, गोवंश व म्हैस अशी एकुण 58 जनावरे ओबड- धोबड जागेत आखुड दोऱ्याने, दाटीवाटीने क्रुरपणे बांधलेली आढळली. ही जनावरे मुक्त करुन पालन पोषन-संवर्धनकामी आनंदादेवी गोशाळा, हाडोंग्री येथे जमा करण्यात आली. या प्रकरणी मानद पशु कल्याण अधिकारी- धन्यकुमार पटवा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पा्रणी संरक्षण अधिनियम कलम- 5 (अ) (ब), 9 (अ) नुसार गुन्हा दि. 08.12.2020 रोजी नोंदवला आहे.