उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात चार ठिकाणी मारहाण : गुन्हे दाखल 

 उस्मानाबाद , पोलीस ठाणे, बेंबळी: सांगवी, ता. उस्मानाबाद येथील सार्वजनिक हातपंपावर पाणी भरतांना 1)अनिता रविंद्र मिसळे 2)रविंद्र मिसळे 3)पार्वतीबाई मिसळे व गावकरी- सारीका लक्ष्मण मस्के यांच्यात दि. 03.12.2020 रोजी 07.30 वा. सु. वाद झाला. यात नमूद तीघांनी सारिका यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन व चावा घेउन जखमी केले आणि ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सारीका मस्के यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, परंडा: नितीन सेरुश काळे, रा. टाकळी, ता. परंडा यांना शेतीची मशागत करण्याच्या वादातून गावकरी- नागनाथ काळे, श्रीकांत काळे, जालिंदर काळे, लक्ष्मण काळे यांनी दि. 04.12.2020 रोजी 10.00 वा. सु. नितीन यांच्या घरासमोर जाउन शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नितीन काळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद, पोलीस ठाणे, उमरगा: बेबाबाई दगडु राठोड, रा. कवठा, ता. उमरगा या दि. 28.11.2020 रोजी 20.00 वा. सु. राहत्या घरासमोर मुलासह उभ्या होत्या. यावेळी शेतजमीनीच्या पुर्वीच्या वादाच्या कारणावरुन भाऊबंद- विनोद राठोड, राजु राठोड, सुनिल राठोड, महेश राठोड यांनी बेबाबाई यांसह त्यांच्या मुलास शिवीगाळ करुन, लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या बेबाबाई राठोड यांनी काल दि. 04.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद , पोलीस ठाणे, तुळजापूर:  निलेश सिरसट व अभिषेक निलेश सिरसट, दोघे रा. शुक्रवार पेठ, तुळजापूर या दोघा पिता- पुत्रांनी दि. 04.12.2020 रोजी 07.30 वा. सु. पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन गल्लीतीलच भाऊबंद- विनायक भगवान सिरसट यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अभिषेक याने विनायकच्या डोक्यात बतईने वार करुन जखमी केले. अशा मजकुराच्या भगवान तुळजाराम सिरसट यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

                                                                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top