उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी अपघात : गुन्हे दाखल
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, लोहारा: महादेव शामराव देवकर, वय 45 वर्षे, रा. मार्डी, ता. लोहारा हे दि. 02.12.2020 रोजी 18.45 वा. सु. बेंडकाळ- मार्डी रस्त्याने मोटारसायकल चालवत होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर निष्काळजीपणे चालवून महादेव देवकर यांच्या मोटारसायकलला पाठीमागून धडक दिल्याने महादेव देवकर हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर पोलीसांना न देता संबंधीत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घटनास्थळावर सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या सुर्यकांत शामराव देवकर (मयताचा भाऊ) यांनी काल दि. 04.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, तुळजापूर: चालक- गोविंद प्रभाकर केंद्रे, रा. बामाचीवाडी, ता. उदगीर यांनी दि. 01.12.2020 रोजी सकाळी 07.00 वा. सु. तडवळा शिवारातील तुळजापूर- काक्रंबा रस्त्यावर ट्रक क्र. एम.एच. 12 एफझेड 3193 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवून पिकअप क्र. एम.एच. 25 आर 3605 ला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअप चालक- आत्ताऊररहेमान अब्दुलजब्बार इनामदार, वय 27 वर्षे, रा. अलुर, ता. उमरगा हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अपघातानंतर नमूद ट्रक चालक घटनास्थळावरुन ट्रकसह पसार झाला. अशा मजकुराच्या मुजीबूररहेमान इनामदार (मयताचा भाऊ) यांनी आज दि. 05.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304(अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद , पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): बाबासाहेब भानुदास देशमुख, रा. 60 वर्षे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दि. 17.10.2020 रोजी 02.00 वा. सु. आळणी फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र- 52 वर बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 25 एसी 7949 ही चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मो.सा. क्र. एम.एच. 25 एक्यु 5462 ही चुकीच्या दिशेने चालवून बाबासाहेब यांच्या मो.सा. ला समोरुन धडक दिल्याने बाबासाहेब यांचा डावा पायाचे हाड मोडले. अशा मजकुराच्या बाबासाहेब देशमुख यांनी उपचारानंतर आज दि. 05.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 119 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.