स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन..
उस्मानाबाद : - शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून शिवसैनिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना सर्व शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले व त्याचबरोबर कोवीड च्या कालावधीमध्ये पुर्ण राज्यभर रक्ताचा तुटवडा होता. आणि मुख्यमंत्री मा . उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते रक्ताचा तुटवडा आहे. तर त्या भावनेतून आज उस्मानाबाद येथे शासकीय रुग्णालयात जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली
विडिओ 👇👇
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर ,नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, माजी नगराध्यक्ष प्रदिप साळुंखे, शिवसेना शहरप्रमुख संजय (पप्पू )मुंडे , दिपक जाधव, एच.एम.देवकते, राजाभाऊ घोडके, शिवसेना कक्ष जिल्हाप्रमुख मोईन पठाण ,
माजी शहरप्रमुख प्रविण कोकाटे, नगसेवक तथा गटनेते सोमनाथ गुरव, तुषार निंबाळकर, बाळासाहेब काकडे, गणेश आचलेकर, सिद्धेश्वर कोळी, भिमा जाधव, पंकज पाटील, कुणाल धोत्रीकर, पांडुरंग भोसले, उपशहरप्रमुख विजय ढोणे, उपशहरप्रमुख बंडू आगरकर, रामेश्वर मगर, साबेर सय्यद, शेषराव उंबरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित