उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी तालुक्यात 7 ठिकाणी व उस्मानाबाद तालुक्यात 1 ठिकाणी अवैध मद्य विरोधी पोलिसांचे छापे
पोलीस ठाणे, वाशी: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या खबरेवरुन वाशी पो.ठा. च्या पथकाने दि. 03.01.2021 रोजी पो.ठा. हद्दीत वेगवेगळ्या सहा ठिकाणी छापे मारले.
पहिल्या घटनेत बालाजी सांगळे, रा. बोरगाव (ध.), ता. कळंब या देशी दारुच्या 5 बाटल्या (किं.अं. 260 ₹) अवैधपणे राहत्या पत्रा शेडमध्ये बाळगल्या असतांना आढळल्या.
दुसऱ्या घटनेत सविता काळे, रा. गोलेगाव पारधी पिढी, ता. वाशी या अवैध गावठी दारु निर्मीचा 200 लि. द्रवपदार्थ व 15 लि. गावठी दारु (किं.अं. 9,550 ₹) अवैधपणे राहत्या घरामागे बाळगल्या असतांना आढळल्या.
तिसऱ्या घटनेत मिरा पवार, रा. पिंपळगाव, ता. वाशी या 8 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 660 ₹) गावशिवारात बाळगल्या असतांना आढळल्या.
चौथ्या घटनेत ताई पवार, रा. शिवशक्तीनगर, वाशी या 15 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 950 ₹) राहत्या पत्रा शेडसमोर बाळगल्या असतांना आढळल्या.
पाचव्या घटनेत दैवशाला काळे, रा. चांदवड, ता. भुम या 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 620 ₹) राहत्या घरासमोर बाळगल्या असतांना आढळल्या.
सहाव्या घटनेत शहाजी आहिरे, रा. घाटपिंप्री, ता. वाशी या देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 416 ₹) राहत्या घराच्याजवळ बाळगले असतांना आढळले.
सातव्या घटनेत अक्काबाई काळे, रा. पारा, ता. वाशी या 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 610 ₹) राहत्या घरामागे बाळगल्या असतांना आढळल्या.
पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): सविता गायकवाड, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद या दि. 03.01.2021 रोजी राहत्या पत्रा शेडमध्ये 10 लि. अवैध गावठी दारु (किं.अं. 610 ₹) बाळगल्या असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळल्या.
यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुद म.दा.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे स्वतंत्र 8 गुन्हे नोंदवले आहेत.