उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण :गुन्हे दाखल

0


उस्मानाबाद जिल्ह्यात 3 ठिकाणी मारहाण :गुन्हे दाखल 

पोलीस ठाणे, तुळजापूर: नामकरणाच्या कार्यात सोन्याचा बदाम न आनल्याच्या कारणावरुन अजय माने, शुकशाला माने, शिला माने, किरण माने, सर्व रा. पापनासनगर, तुळजापूर यांनी दि. 02.01.2021 रोजी 21.30 वा. सु. गल्लीतीलच नातेवाईक- शंकर निवृत्ती माने, यांसह त्यांच्या आईस त्यांच्या राहत्या घरी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या शंकर माने यांनी काल दि. 03.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, शिराढोन: सुरेश शेषेराव चव्हाण, रा. लोहटा (प.), ता. कळंब हे दि. 02.01.2021 रोजी गावातील हनुमान मंदीरासमोर थांबले होते. यावेळी पुर्वीच्या भांडणा राग मनात धरुन भाऊबंद- ज्योतीबा चव्हाण, गोविंद चव्हाण, अशोक चव्हाण यांनी तेथे येउन सुरेश चव्हाण यांना लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या सुरेश चव्हाण यांनी काल दि. 03.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

पोलीस ठाणे, भुम: पती- पत्नी विदुषक व सुशमिला काळे, रा. वालवड, ता. भुम यांनी शेतजमीन वहिवाटीच्या कारणावरुन महामुन व अश्विनी काळे, रा. मोहितेवस्ती जवळ वालवड, त. भुम या दोघा पती- पत्नींना दि. 02.01.2021 रोजी 19.00 वा. मोहिते वस्ती येथे शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अश्विनी काळे यांनी काल दि. 03.01.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top