उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाया
उस्मानाबाद जिल्हा: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद पोलीसांनी 15 मार्च रोजी जिल्हाभरात वेगवेगळ्या 7 ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त केली असुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्या प्रकरणी 8 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे 7 गुन्हे दाखल केले आहेत.
1) दिपक वाघुलकर, रा. बेंबळी हे गावातील किराणा दुकानासमोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 570 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.
2) ज्ञान भारती व चंद्रकांत खराटे, दोघे रा. कळंब हे शहरातील सुनिल मार्केट समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,850 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.
3) बालाजी राठोड, रा. घाटांग्री तांडा हे गावातील टपरीमध्ये कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 4,370 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.
4) संतोष माने, रा. धोत्रा रस्ता, ता. परंडा हे गावातील बीयरबार समोर कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 690 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.
5) दिपक कर्वे, रा. तामलवाडी हे गावातील पाण्याच्या टाकीजवळ मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,000 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना तामलवाडी पो.ठा. च्या पथकास आढळले.
6) राजेंद्र ढवारे, रा. ढोकी हे ढोकी पेट्रोल पंप चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 350 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.
7) रमेश मोळवणे, रा. वाशी हे सरमकुंडी फाटा येथे मुंबई मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 460₹ रोख रक्कम बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.
अशी माहिती जिल्हा पोलीस माहिती विभाने माहिती दिली आहे.