लोहारा शहरातील जुन्या गावातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान जवळील बाजुस नगर पंचायत शहरातील मैला टाकण्यासाठी टॅंकचे काम सुरू केले आहे, हे काम त्वरित थांबवावीण्यात यावे -- मुस्लिम समाजाची मागणी..
उस्मानाबाद/प्रतिनिधी
लोहारा शहरातील जुन्या गावातील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान जवळील बाजुस नगर पंचायतने शहरातील मैला टाकण्यासाठी टॅंकचे काम सुरू केले आहे, हे काम त्वरित थांबवावीण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार, नगर पंचायत, पोलीस ठाणे लोहारा यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा शहरातील मैला गोळा करुन टाकण्यासाठी मुस्लिम समाजाच्या कब्रस्तान जवळील नगर पंचायतीच्या खुल्या जागेत टॅंकसाठी नगर पंचायतने खोदकाम सुरू केले आहे. सदरील टॅंकचे काम कब्रस्तानच्या पाच ते सात फुटावर आहे. कब्रस्तान टॅंकच्या उतार बाजुस आहे. यामुळे टॅंकचे आउटलेट हे कब्रस्तानच्या बाजुस होणार असल्यामुळे टॅंक मधील सर्व मैला कब्रस्तानमध्ये पसरला जाईल व या टॅंकमधील मैला जमिनीतुन परक्युलेशन होऊन कब्रस्तानमध्ये शिरण्याची दाट शक्यता आहे. या अगोदर नगर पंचायतच्या वतीने शहरातील कचरादेखील कब्रस्तान व दर्गाच्या बाजुस टाकण्यात येत आहे, यामुळे दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येत आहे. हा कचरा देखील शहरातील तिन कि.मि.च्या बाहेर टाकण्यात यावा. या कब्रस्तान जवळ दर्गा असल्याने मुस्लिम समाजातील व्यक्ती नमाज अदा करण्यासाठी त्याठिकाणी जातात. याठिकाणी टॅंकचे काम झाले तर दुर्गंधी पसरून आरोग्य धोक्यात येऊ शकतो, तरी या टॅंकचे काम तात्काळ थांबविण्यात यावे, अन्यथा मुस्लीम समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर जामा मस्जिद अध्यक्ष हैदर शेख, उस्मान हेडडे, उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, सलीम शेख, आयुब शेख, न.प.गटनेते अभिमान खराडे, शब्बीर गवंडी, इकबाल मुल्ला, नगरसेवक शाम नारायणकर, नजिर मुलका, अमिन सुंबेकर, रफिक सिद्दीकी, दादा मुल्ला, ताहेर पठाण, रियाज खडिवाले, बिलाल गवंडी, आयनोददीन सवार, इनुस पटेल, रफिक शेख, मुबारक गवंडी, अमिन कुरेशी, सलीम कुरेशी, जुबेर इनामदार, श्रीकांत भरारे, मल्लिकार्जुन पाटील, समिर शेख, आसीफ खुटेपड, अदिंच्या सह्या आहेत.