Osmanabad : जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर आंदोलन करुण मोदी सरकार चा जाहीर निषेध केला
Osmanabad : गॅस सिलेंडरच्या आणि इंधन दरात सातत्याने वाढ करत आहे. "फेब्रुवारी महिन्यामध्ये तब्बल 3 वेळा गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये वाढ झाली ही अनुक्रमे 25, 50, 25 इतकी वाढवली गेली. मार्च महिन्यात पहिल्याच दिवशी 25 रुपये वाढ केली.गॅस सिलेंडरचा आजचा भाव 827 रुपये असुन स्वातंत्र्यानंतर च्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिन्यात इतकी वाढ केली. यामुळे सर्वसामान्य जनता, गृहिणी त्रस्त झाले आहेत त्यांचे जगणे असह्य झाले असुन बजेट बिघड़ले आहे. जनतेच्या अपेक्षा पूर्ण न करणारे मोदी सरकार असुन , ईंधन दरवाढ, महागाई यामुळे मोदी सरकार सर्वसामान्य जनतेला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करत आहे ह्या दर वाडीच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस च्या सुचने नुसार उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने अंदोलन करुन निषेध करण्यात आला यावेळी उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष रोहीत पडवळ, तुळजापुर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मकरंद डोंगरे, बिभिषण हजारे, विलास कोरेकर, विजयसिंह घोगरे, विशाल हजारे, संजय कोरेकर,दिनेश डोंगरे, राजपाल पडवळ, प्रविण पडवळ, इंद्रजीत हजारे, प्रमोद बचाटे, सुभाष पाचपुंडे व युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते
छाया राहुल कोरे आळणीकर