google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 Osmanabad : हॉटेल, रेस्टॉरंट, बार, किराणा दुकानांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

Osmanabad : हॉटेल, रेस्टॉरंट, बार, किराणा दुकानांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती - जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर

0

Osmanabad : हॉटेल, रेस्टॉरंट, बार, किराणा दुकानांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती  -  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर
 
        Osmanabad : दि.10 :- कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत शासनाकडून वेळोवेळी देण्यात आलेले आदेश, एसओपी  यांची कडक अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, बार आणि किराणा दुकानांच्या तपासणीसाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज एका आदेशाद्वारे केली  आहे.
           उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट व तत्सम आदरातिथ्य सेवा 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील याची खातरजमा करणे, या ठिकाणी कोविड-19 च्या प्रतिबंधात्मक अंतराचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत अचानक तपासणी करणे आणि उल्लंघन आढळून आल्यास संबंधित आस्थापनांच्या व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करणे या कामाकरिता येथील अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
          बार (कॅफे, कँटिन, डायनिंग हॉल, रिसॉर्ट, क्लब मधील बाहेरील एफ आणि एल लायसन्सधारक युनिट, आऊलेटसह) 50 टक्के क्षमतेसह सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील याची खातरजमा करणे, याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
           किराणा मालाची दुकाने सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरु राहतील याची खातरजमा करणे यासंबंधी सहायक नियंत्रक, वैद्यमापन (वजने व मापे ) उस्मानाबाद यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.
******

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top