Osmanabad : शहरात अल्पसंख्खाकासाठी वस्तीगृह व उर्दू भवन निर्माण करावे - बाबा फैजौद्दीन
उस्मानाबाद :- जिल्ह्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी उस्मानाबाद शहराच्या ठिकाणी व जिल्ह्यातील तुळजापूर उमरगा या ठिकाणी वस्तीग्रह निर्माण करावे अशी मागणी बाबा फैजोद्दीन यांनी केली आहे.
उमरगा , तुळजापुर या तालुक्यात मुस्लीम लोकसंख्या 20 ते 25 टक्के आहे. या ठिकाणी राहणाऱ्या अल्पसंख्यांकांची घरची आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची सवलत घेता येत नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून अल्पसंख्यांक मंत्री यांनी स्वतः लक्ष देऊन जिल्ह्यात अल्पसंख्यांक मुलांसाठी वस्तीगृह करावे तसेच उस्मानाबाद शहरात उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्यांची व उर्दू शाळांची संख्या जास्त असल्यामुळे उस्मानाबाद शहरात एक उर्दू भवन होणे आवश्यकता असून जेणेकरून उर्दू भवन निर्माण झाल्यास अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल तरी माननीय मुख्यमंत्री साहेब व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक साहेब यांनी उस्मानाबाद जिल्हा कडे विशेषता लक्ष द्यावे . उस्मानाबाद शहरात अल्पसंख्यांकांची संख्या 15 ते 25 टक्के पर्यंत आहे एक अल्पसंख्यांक वस्तीग्रह व उर्दू भवन उभारून अल्पसंख्यांकसाठी न्याय द्यावा अशी मागणी ई मेल च्या द्वारे माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धव ठाकरे यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते , महाराष्ट्र उर्दू हिंदी मराठी पञकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाबा फैजोद्दीन यांनी केली आहे.


