tuljapur - बसवंतवाडी शाळेत स्वयंशासन दिन उत्साहात साजरा

0
तुळजापूर (दि.16) तालुक्यातील बसवंतवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इ.8 वी च्या विद्यार्थ्यांचा स्वयंशासन दिन व निरोप समारंभ दि.15 मार्च 2021 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील सर्वात मोठा वर्ग म्हणजे इ.8 वी चा आहे. त्यामुळे या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून कार्य करण्याची एक संधी या स्वयंशासन दिनानिमित्त उपलब्ध करून देणे व त्यांना 7 वीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप देणे हा या दिनाचा उद्देश होता. या दिनाचे मुख्याध्यापक म्हणून समर्थ वशिष्ठ ताटे याने तर उपमुख्याध्यापक म्हणून श्रद्धा शुक्राचार्य भोसले हिने पदभार सांभाळला. सकाळी परिपाठ घेण्यापासून 5 ली ते 7 वीच्या वर्गांना सर्व विषयाचे तासिका निहाय अध्यापन 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले. या प्रसंगी आठवीतील विद्यार्थ्यांनी शाळेला मुख्याध्यापक साठी व्हील चेअर भेट म्हणून दिली. सातवीच्या विद्यार्थ्यांकडून आठवीच्या विद्यार्थ्यांना पोहे, गुलाबजामुन हे पदार्थ खाऊ म्हणून देण्यात आले. दुपारी 3 वा.आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःचे दिवसभरातील अनुभव कथन केले तसेच इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक उंबरे पोपट, शिक्षक टेंगळे श्रीमंत,चौधरी प्रमोद, ढोणे दिपक,घोडके राजकुमार,गारोळे धोंडिबा,शिंदे रामचंद्र व सुरवसे सुसेन यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद चौधरी यांनी तर आभार सुसेन सुरवसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top