google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 इलेक्ट्रिकल टोटल स्टेशन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

इलेक्ट्रिकल टोटल स्टेशन मशीनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण

0


     उस्मानाबाद,दि.11(जिमाका):-जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून भूमी  अभिलेख विभागास   पुरविण्यात आलेल्या आधुनिक इलेक्ट्रॉनिक टोटल स्टेशन मशिनचे लोकार्पण येथील महसूल भवन येथे आज जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले .                 

      यावेळी  डिजीटल इंडिया मॉडर्नायजेशन प्रोग्रॅम अंतर्गत ई-फेरफार या प्रणालीतुन फेरफार झालेल्या मिळकत पत्रिका व डिजीटल साईन मिळकत पत्रिकांचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी श्री दिवेगावकर  यांच्या  हस्ते शेतकरी कुंटूबियांना सानुग्राह अनुदान वाटप करण्यात आले.  जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी लॉकडाऊनमुळे प्रलंबीत असलेली शेतकऱ्यांची कामे प्राधान्याने करण्याचे आदेश  त्यांनी दिले.

     यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख श्रीमती स्वाती लोंढे,उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे, तहसीलदार गणेश माळी,उपअधीक्षक भूमी अभिलेख  ( उमरगा ) श्रीमती वैशाली गवई,उपअधीक्षक भूमी अभिलेख ( उस्मानाबाद) अशोक माने आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top