उस्मानाबाद जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून डॉ.शकील अहमद खान यांचा सत्कार

0

उस्मानाबाद: ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी उस्मानाबाद नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र -1 वैराग रोड उस्मानाबाद येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. शकील  अहमद खान यांची निवड झाल्या बद्दल उस्मानाबाद जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी. के.पाटील यांनी सत्कार करुन खान यांना सुभेच्छा दिल्या आहेत


ऑल इंडिया युनानी मेडिकल काँग्रेसच्या महाराष्ट्र संघटनेचे केंद्रीय कार्यकारिणीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. सय्यद अहमद खान यांच्या मार्गदर्शनानुसार संघटनेचे राष्ट्रीय संयोजक तथा प्रशासक डॉ. एस. एम. हुसेन यांनी ही निवड केल्याचे जाहीर केले आहे.

ऑल इंडिया युनानी मेडिकल काँगेस, नवी दिल्ली या संस्थेचे डॉ. शकील अहमद खान हे महाराष्ट्रातील सक्रिय पदाधिकारी आहेत. यापूर्वी संघटनेेचे महाराष्ट्र प्रदेश वैद्यकीय अधिकारी विंगचे अध्यक्ष म्हणून म्हणून काम पाहिलेले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली आहे. गतवर्षीच संघटनेच्या वतीने राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलेले होते. उस्मानाबाद जिल्ह्यातून डॉक्टर शकील अहमद खान यांचे कौतुक व सुभेच्छा चा वर्षाव होते आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top