कोरोनाच्या काळात बसवराज पाटील यांच्याकडून रुग्ण व नातेवाईकांना मिळला आधार
३०००० पेक्षा जास्त डब्याचे अन्नदान
( महादेव पाटील )
महाराष्ट्र काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नियोजनातून उमरगा व लोहारा तालुक्यातील कोरोना उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी ४० दिवस आठशे जणांना दररोज भरपेठ जेवणाची व्यवस्था करण्यात येत होती त्यांचा समारोप गुरुवारी(दि १० जून) रोजी करण्यात आले.
गेल्या ४०दिवसापासून काँग्रेसचे कार्यकर्ते दुपारच्या सत्रात सरकारी, खाजगी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्ण व नातेवाईकांपर्यत जेवणाचा डबा पोहोंच करीत होते.
उमरगा, लोहारा तालुक्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग गतीने वाढला आणि अनेकांना त्याची बाधा झाली. गरिब कुटुंबातील अनेक रुग्णांना उपचारासाठी येणाऱ्या अडचणी निर्माण होत असल्याने काँग्रेस समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी कार्यकर्त्यांना सक्रिय करून कोरोनासंदर्भात मदत केंद्र सुरू केले. कोरोनाची दुसऱया लाटेत रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत होती. सर्व शासकीय दवाखान्यासह खाजगी रुग्णालये कोरोना रुग्णांनी भरली होती. यादरम्यान शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यामुळे रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी जेवणाची अडचन होत होती. हे लक्षात घेऊन तालुका काँग्रेस समितीच्या वतीने १ मे पासून उमरगा शहरातील उपजिल्हा रुग्णालय, सात कोविड सेंटर व दोन कोरोना केअर सेंटर, मुरुम तसेच लोहारा तालुक्यातील तीन कोरोना केअर सेंटर येथे दररोज आठशे जणांपर्यंत कार्यकर्ते जेवणाचा डबा पोहच करत होते. मुरूम येथे आचाऱ्यामार्फत जेवणाची तयारी पहाटे पासुनच सुरू होत असत. रुग्णां व नातेवाईकापर्यंत पोळी, भाजी, भात व चपाती असं चांगल्या दर्जाचे भोजन तयार करण्यात येत होते. अकरानंतर जेवणाचे पार्सल डबे वहानातुन थेट रुग्णालयापर्यंत पोहच होता होते. मुरूम बाजार समितीचे सभापती बापुराव पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील अन्नदानाचे काम सुरळीत ठेवण्यासाठी लक्ष देऊन पाहणी करतात. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, युवा नेते विजय वाघमारे, नगरसेवक महेश माशाळकर, पप्पू सगर, याकुब लदाफ, बालाजी वडजे, व्यंकट पवार, ईश्वर तुकशेट्टी, बाबा मस्के, जीवन सरपे, बालाजी पवार, सोहेल इनामदार, चंद्रकांत मजगे, सहदेव जेवळे, मैलारी सुतार, अण्णाराव कांबळे, दिलीप कुंभार आदी कार्यकर्ते रुग्णालयात जाऊन जेवणाच्या डब्याचे वितरण करतात.काँग्रेसच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या जेवणाच्या डब्ब्यामुळे रुग्ण व नातेवाईकांना मोठा आधार मिळाला होता.
"कोरोना संकटाने अनेक कुटुंबावर आघात केला आहे. बाधित व्यक्तीना योग्य उपचार मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. कोविडच्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतुन केला जातोय. संकटात अनेक जण माणुसकीतुन काम करीत आहेत. प्रदेश काँग्रेस समितीने राज्यभर रक्तदान शिबीरे घेऊन रक्तसंकलन केले. उमरगा - लोहारा तालुक्यात कार्यकर्त्यांकडून रुग्ण व नातेवाईकांना अन्नदानाचे ४०दिवस अविरत काम सुरु होते."
बसवराज पाटील, कार्याध्यक्ष, प्रदेश काँग्रेस समिती