शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंती निमित्त वृक्षारोपण

0
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या जयंती निमित्त वृक्षारोपण  

कळंब.प्रतिनिधी, ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे संस्थापक कै. शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 27 जुलै 2021 रोजी महाविद्यालयाच्या क्रीडा संकुलनावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ.संदीप महाजन आणि डॉ . नामानंद साठे , डॉ. मीनाक्षी जाधव तसेच एनसीसी विभाग प्रमुख डॉ.हरिभाऊ पावडे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रदीप गायकवाड ,नितीन चौधरी धनराज खापे, गौरव रोडे ,अजय राक्षे ,सुनील ठाकरे, प्रसाद करवलकर ,नितीन जाधव, लखन हगारे, राजकुमार शिंदे ,मारुती शिंपले, विकास गायके, शुभम कुरुंद, सावता शिंदे आदी स्वयंसेवक उपस्थित होते. वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.के.डी. जाधव, डॉ.डी एस सूर्यवंशी, श्री अरविंद शिंदे प्रा.ईश्वर राठोड व संदीप सूर्यवंशी यांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top