उस्मानाबाद :- जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी भुम यांना लाच स्वीकारताना लाच लुचपत विभागाने लाच स्विकारताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार- पुरुष, वय-29 वर्ष, यांनी लाचलुचपत विभाग कडे तक्रार केली होती प्राप्त तक्रारीची खात्री करून लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे
आरोपी लोकसेवक :-
1)श्रीमती मनिषा अरुण राशिनकर,वय 45वर्षे,उप विभागिय अधिकारी,उप विभाग भुम, जि.उस्मानाबाद वर्ग 1 ,
2) विलास नरसींग जानकर,वय 32वर्षे, कोतवाल, देवळाली सज्जा प्रतीनियुक्ति उप विभागिय अधिकारी कार्यालय भुम , वर्ग 4 .
लाचेची मागणी -- रुपये 1,10,000/- व तडजोडी अंती रुपये 90000 /- व रुपये 20,000/- आरोपी क्र.2 चे हस्ते स्विकारले लाच रक्कम स्वीकारली- 20,000/- रुपये ..
तक्रारदार यांचा एक टीप्पर व त्याच्या पाहुण्यांचा जे.सी.बी.व तीन ट्राक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी आरोपी क्र.1 व 2 यांनी तक्रारदार याच्याकडे प्रती महिना 1,10,000/- रुपये लाच मागणी करून तडजोडी अंती 90,000/- लाच मागुन त्यापैकी 20,000/- रुपये लाच आरोपी क्र.2 हस्ते स्वीकारल्याने त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.भुम येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. अशी माहिती प्रसार प्रसारमाध्यमांना लाचलुचपत विभागाकडून देण्यात आली आहे.
हि कारवाई प्रशांत संपते,पोलीस उप अधीक्षक ,ला.प्र.वि. उस्मानाबाद यांनी मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद मा.ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि.औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.गौरिशंकर पाबळे, अंमलदार दिनकर उगलमुगले, विष्णू बेळे, विशाल डोके.यांनी हि कारवाई केली आहे.
लाचे संबंधी तक्रार देण्यासाठी:-
टोल फ्री क्र:-1064
दूरध्वनी क्र:-02472/222879
पोलीस उप अधीक्षक,ला प्र वि उस्मानाबाद:- 9527943100