शिराढोन पोलीस ठाण्यातील रक्तदान शिबीरात 577 व्यक्तींचे रक्तदान.
शिराढोन पोलीस ठाणे : कोविड- 19 काळात रक्तदानाचे प्रमाण घटल्याने रुग्णांस रक्त पुरवठा करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. याकरीता शिराढोन पोलीस व विविध सामाजिक संघटनांच्या सामुदायीक प्रयत्नातून व सह्याद्री रक्त पेढी, उस्मानाबाद यांच्या सहकार्याने काल दि. 26 जुलै कारगील विजय दिनाचे औचित्य साधुन शिराढोन पोलीस ठाण्यात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात शिराढोन पोलीस ठाण्याचे 30 पोलीस अधिकारी- अंमलदार, 20 गृहरक्षक दल जवान आणि 527 नागरीक अशा 577 व्यक्तींनी रक्तदान करुन सामाजीक बांधीलकीचे दर्शन घडवले.