चोरीच्या विद्युत पंप व वायरसह दोघे अटकेत, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा : शेत शिवारातील सिंचन पंप चोरी शोधात असलेल्या स्था. गु. शा. च्या पोउपनि- श्री भुजबळ, पाहेकॉ- काझी, शेळके, पोना- घुगे, पोकॉ- सर्जे यांसह वाशी पो.ठा. चे पोहेकॉ- कुट्टे, पोकॉ- करवर अशा संयुक्त पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने दि. 26 जुलै रोजी भुम तालुक्यातील निपाणी गावात छापा टाकला. यावेळी गावकरी- ज्ञानेश्वर अल्हाट व उमेश खंदारे यांच्या ताब्यात आढळलेला कुपनलिका विद्युत पंप व वायर विषयी पथकाने माहिती घेतली असता नमूद माल शेतातील कुपनलिकेतून चोरीस गेल्यावरुन वाशी पो. ठा. येथे गु.र.क्र. 225 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल असल्याचे समजले. यावरुन नमूद माल जप्त करुन दोघांना अटक करण्यात आली आहे.