ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी समाज घडविण्याचे कार्य केले- प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर

0
ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी समाज  घडविण्याचे कार्य केले- प्रा.डॉ.प्रल्हाद लुलेकर

कळंब:-(२७ जुलै २०२१) प्रतिवर्षाप्रमाणे शि. म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांची ९४ वी जयंती येत्या २७ जुलै रोजी झूम मीटिंग वर साजरी करण्यात आली.त्यासाठी  प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम व्याख्याते डॉ.प्रल्हाद लुलेकर उपस्थित होते, यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले  ," कै. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांचे सामाजिक ,शैक्षणिक,कृषी, सांस्कृतिक व पत्रकारिता इत्यादी क्षेत्रातील कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून स्वतः शिक्षण घेतल्यानंतर गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञान प्रसारक मंडळ स्थापन केली, त्यातून बहूजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने  समाज घडविण्याचे कार्य  अलौकिक अशा पद्धती केले आहे. त्यांच्यामुळेच आज मराठवाड्यासारख्या मागास भागातील अनेक पिढ्या शिक्षणाच्या माध्यमातून स्वावलंबी जीवन जगत आहेत."
महाविद्यालयातील मोहेकर गुरुजींच्या पुतळ्याचे पूजन आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते झाले, यावेळी संस्थेचे सचिव आदरणीय डॉ.अशोकराव मोहेकर, प्राचार्य डॉ. सुनिल पवार, उपप्राचार्य जी.यु. घोलप, प्रा.संजय मिटकरी, श्री टी.जे.चौधरी, ह.भ.प महादेव महाराज आडसूळ, सुभाष घोडके, माधवसिंग राजपूत आदी उपस्थित होते.
त्यानंतर विद्याभवन हायस्कूल परिसरात असणाऱ्या मोहेकर गुरुजींच्या समाधीचे पूजन डॉ.अशोकराव मोहेकर, हनुमंत तात्या मडके ,डॉ. डी एस जाधव,प्रा. बोबडे आणि मोहेकर कुटुंबातील सदस्य व प्रशालेतील शिक्षक आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी मोहेकर गुरुजी अण्णा यांच्या संदर्भात हभप श्रीकृष्ण रेवले महाराज सोनपेठ, डॉ. दादाराव, गुंडरे, प्राचार्य डॉ. व्ही. एस. अनिगुंठे , डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ.दत्ता साकोळे ,डॉ. केदार काळवणे,  अजित मोहेकर ,आकाश मोहेकर, श्वेता मोहेकर, आर्या काकडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच  सुरवसे ,मानसी वाघमारे यांचे व्हिडिओद्वारे, कलागुण सादर केले.
या कार्यक्रमात संस्थेतील लातूर, मातोळा, मोहा,येरमाळा, जवळा व पारा इत्यादी ठिकाणी असलेले सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्याप्रमाणात जॉईन झाले होते.  
या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम रासेयो व एनसीसी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे मोहेकर गुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन, समाधी स्थळाकडील पूजन,  हे सर्व   आँनलाईन चित्रीकरण सहायक ग्रंथपाल श्री अरविंद शिंदे यांनी केले, तर शेवटीस झूमवर कार्यक्रमाचा आस्वाद घेणाऱ्यांचे आभार प्रा.डॉ.के.डी.जाधव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top