कळंब महिला रुग्णालयाच्या मुसद्दीक काझी यांच्या मागणीस यश
कळंब - उपजिल्हा रुग्णालयात महिला रुग्णालय निर्माण होण्यासाठी योग्य त्या निकषानुसार प्रस्ताव तयार करून आरोग्य सेवा संचालनालयास सादर करण्याचे पत्र क्रमांक 8045 -47 दि.11-5-2021 अन्वये सहसंचालक मुंबई यांनी उपसंचालक आरोग्य सेवा लातूर यांना आदेशित केले आहे.
आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे कळंब दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुसद्दीक काझी यांनी उपजिल्हा रुग्णालय कळंब येथे ट्रामा केअर विभाग चालू करण्या संदर्भातील निवेदन दिनांक 17 जानेवारी 2021 रोजी दिले होते.
त्या निवेदनात म्हटले होते की, कळंब तालुक्यात एकही आपत्कालीन सेवा व अत्यावश्यक आधुनिक वैद्यकीय सेवा असणारे खाजगी रूग्णालय उपलब्ध नसल्यामुळे कळंब उपजिल्हा रुग्णालयात आपत्कालीन गंभीर रुग्णास इतरत्र हलवले जात असल्याने उपचाराअभावी रस्ता मध्येच मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. तालुक्यात शंभर गावांची ये-जा असून प्रमुख बाजारपेठ कळंब शहरातच आहे.त्यामुळे इथे आपत्कालीन आरोग्य सेवा उपलब्ध होणे गरजेचे आहे.
या निवेदनावर रा.कॉ.यु.पा.चे प्रदेश चिटणीस तारेख मिर्झा,प्रदेश सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे,तालुका अध्यक्ष प्रा.श्रीधर भवर, जिल्हा उपाध्यक्ष महम्मद चाऊस,तालुका कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे,तालुका कार्याध्यक्ष प्रा.शिवाजीराव लकडे,नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा आदींच्या स्वाक्षऱ्या होत्या.