नूतन उपसभापती श्री दत्तात्रय भास्कर शिंदे यांचा सांगवी (काटी) येथे नागरी सत्कार.
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पंचायत समिती गणाचे कर्तव्यदक्ष पंचायत समिती सदस्य श्री दत्ता शिंदे यांची तुळजापूर तालुका पंचायत समिती उपसभापती पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे भिम नगर सांगवी (काटी)येथील ग्रामस्थांकडून नागरी सत्कार करण्यात आला. पहिल्याच टर्म मध्ये एवढ्या मोठ्या पदापर्यंत मजल मारल्यामुळे ग्रामस्थांकडून त्यांचे कौतुक देखील करण्यात आले. व श्री शिंदे यांना पुढील कार्यास शुभेच्छा देखील देण्यात आल्या. यावेळी गावचे सरपंच सौ ललिता मगर, उपसरपंच मिलिंद मगर, ग्रामपंचायत सदस्य सतीश सुर्ते , रवी मगर, निवांत शेळके, वंदना नानासाहेब नगर, राजेंद्र जाधव, संजय शिंदे, दत्ता सुरते, ते साधू गायकवाड, अमोल सुरते, भास्कर साबळे, उमेश सुरते, लक्ष्मण माळी, बापू रोकडे, संजय बनसोडे, श्रीकांत गायकवाड,भुजंग सुरते ई ग्रामस्थ उपस्थित होते.