महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसा निम्मित रक्तदान शिबिर .
(प्रतिनिधि) सांगवी (का)
तुळजापुर तालुक्यातील तामलवाडी येथे विठ्ठल रुक्माई मंदिराच्या सभामंडपात महाराष्ट्राचे लोकप्रिय व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांनी इतर व्यर्थ खर्चाला फाटा देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला .या कार्यक्रमाच्या प्रसंगी सह्याद्री ब्लड बँक उस्मानाबाद यांचे सर्व कर्मचारी वृंद यांचेसह शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी शिवसेना गण प्रमुख तथा युवा सेना तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय उर्फ अप्पू राजे गवळी ,शिवसेना शाखाप्रमुख अमोल घोटकर, रामेश्वर कांबळे ,सौदागर जाधव ,अक्षय गवळी, गणेश सराटे ,कृष्णा घोटकर ,सिद्धेश्वर घोटकर ,अनिरुद्ध कदम ,नितीन ढेकणे, प्रल्हाद गुंड ,ज्ञानेश्वर कदम, तुकाराम किसन गायकवाड, तुकाराम धर्मा गायकवाड, एकनाथ गायकवाड, व परिसरातील युवक कार्यकर्ते उपस्थित होते या शिबिरात 32 व्यक्तींनी आपले रक्तदान केले होते. या कार्यक्रमास सर्व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.