जिल्ह्यात चोरीच्या बकऱ्यांसह तीघे अटकेत
उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा: स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखालील सपोनि- श्री. निलंगेकर, पोउपनि- श्री. भुजबळ, पोहेकॉ- शेळके, पोकॉ- सावंत, ढगारे, कोळी, ठाकुर यांच्या पथकास गोपनिय माहिती मिळाल्यावरुन काल दि. 28 जुलै रोजी 1) बाळु सावंत 2) रावसाहेब कदम, दोघे रा. जळकोट 3) शफी शेख, रा. हंगरगा (तुळ), ता. तुळजापूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी नळदुर्ग पो.ठा. हद्दीत बकऱ्या चोरी केल्यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे गु.र.क्र. 244 / 2021 हा तपासास असल्याचे समजले. नमूद तीघांच्या ताब्यातून या गुन्ह्यातील चोरी केलेल्या 13 बकऱ्यांसह बकऱ्या विक्रीतील 23,000 ₹ रोख रक्कम व चोरी करण्यास वापरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. अधिक चौकशी दरम्यान नमूद तीघांनी बकऱ्या चोरी संबंधी नळदुर्ग हद्दीतच गु.र.क्र. 21 / 2020, 374 / 2020, 42 / 2021 हे 3 गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले असून उर्वरीत तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.